+++ version = "1.4" aliases = ["/version/1/4/mr"] +++ # योगदाता ठराव आचारसंहिता ## आमची प्रतिज्ञा मोकळे आणि स्वागतार्ह वातावरण घडविण्याचा हिताने आम्ही, योगदाता आणि पालनकर्ता, प्रतिज्ञा घेतो कि आमच्या प्रकल्पात आणि समुदायात सहभाग हा सगळ्यांसाठी, वय, शवाकार, अपङ्गत्व, वंश, लैङ्गिक वैशिष्ट्ये, लैङ्गिक अवतार, अनुभव, शिक्षण, आर्थिक स्थिती, राष्ट्रीयत्व, वैयक्तिक अवतार, जात, पन्थ किंवा कामसिक आवड, यांची पर्वा न करता, एक छळमुक्त अनुभव राहिल. ## आमचे मापदण्ड सकारात्मक वातावरण तयार करण्यात योगदान देणार्या स्वभावाची उदाहरणे समाविष्टतात: * स्वागतार्ह आणि सर्वसमावेशक भाषा वापरणे * भिन्न दृष्टीकोन आणि अनुभवांचा आदर करणे * कृतज्ञपणे विधायक टीका स्वीकारणे * समुदायाचा हिता कडे लक्ष केंद्रित करणे * समुदायाचा इतर सदस्यांबद्दल सहानुभूती दर्शविणे सहभागींनी अस्वीकार्य वर्तनाची उदाहरणे समाविष्टतात: * लैंगिक भाषा किंवा प्रतिमेचा वापर आणि अनिष्ट कामसिक लक्ष किंवा हल्ला * विवादस्पद, अपमानजनक / निंदनीय टिप्पण्या आणि वैयक्तिक किंवा कुटनैतिक हल्ले * सार्वजनिक किंवा खाजगी छळ * स्पष्ट परवानगीशिवाय इतरांची खाजगी माहिती प्रकाशित करणे, उदाहरणात भौगोलिक किंवा विद्युतीय पत्ता * इतर आचरण जे वाजवी हिशोबाने व्यावसायिक वातावरणात अयोग्य मानले जाऊ शकतात ## आमच्या जबाबदार्या प्रकल्प पालनकर्तांवर स्वीकार्य मानदंड स्पष्टीकरणाची जबाबदारी आहे आणि अस्वीकार्य वर्तन वर योग्य, सुनैतिक व सुधारात्मक कारवाई करण्याची अपेक्षा आहे. ह्या आचारसम्हितेच्या सलग्न नसल्यास टिप्पण्या, प्रतिबद्ध, मन्त्र, श्रुति सम्पादने, मुद्दे आणि इतर योगदान सुधारायची, हटवायची किंवा नाकारायची, किंवा कुठलेही योगदाता ज्यांचे वर्तन अयोग्य, धोकादायक, आक्षेपार्ह किंवा हानिकारक वाटतात, त्यांना तात्पुर्ता किंवा कायमस्वरुपी प्रतिबन्धित करायचा हक्क व जवाबदारी प्रकल्प पालनकर्तां कडे आहे. ## व्याप्ती ही आचारसंहिता प्रकल्पाच्या सर्व ठिकाणी लागू होते आणि तेव्हा देखील लागू होते जेव्हा एखादी व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी प्रकल्प किंवा प्रकल्प समुदायाचे प्रतिनिधित्व करतात. प्रकल्प किंवा समुदायाचे प्रतिनिधित्व करण्याच्या उदाहरणांमध्ये अधिकृत विजपत्र पत्ता वापरणे, अधिकृत सामाजिक माध्यमांच्या खात्याद्वारे टपाल करणे किंवा विद्युताभासी व वास्तविक प्रसङ्गांमध्ये नियुक्त प्रतिनिधीत्व करणे समाविष्ट आहे. प्रकलापाचे चे प्रतिनिधीत्वची व्याख्या आणि स्पष्टीकरण प्रकल्प पालनकर्तां कडून पुढे दिले जाऊ शकते. ## अंमलबजावणी अपमानास्पद, त्रासदायक किंवा अन्यथा अस्वीकार्य वर्तनांची घटना [येथे विजपत्र पत्ता घाला] वर प्रकल्प कार्यसंघाला संपर्क साधून नोंदवणे. सर्व तक्रारींचे पुनरावलोकन आणि तपासणी केले जाईल आणि त्यास गर्जेला भाग व परिस्थितीला आवश्यक असा प्रतिसाद मिळेल. एखाद्या घटनेच्या बातमीदारांच्या संदर्भात गोपनीयता राखण्याचे कर्तव्य प्रकल्प कार्यसङ्घाचे आहे. या अतिरिक्त विशिष्ट अंमलबजावणी धोरणांचे तपशील वेगळे टपालीत करणे. जे प्रकल्प पालनकर्ते आचारसंहिता पाळत नाही किंवा सुश्रद्धेत अंमलात आणत नाही, ते, प्रकल्प नेतृत्वच्या सदस्यांने ठरवल्या प्रमाणे, तात्पुरते किंवा कायमस्वरूपी परिणामांना सामोरे जातील. ## श्रेय ही आचारसंहिता [सहयोगकर्ता करार] [मुख्यपृष्ठ], आवृत्ती १.४, https://www.contributor-covenant.org/mr/version/1/4/code-of-conduct.html वर उपलब्ध आहे. [मुख्यपृष्ठ]: https://www.contributor-covenant.org या आचारसंहितेविषयी सामान्य प्रश्नांच्या उत्तरांसाठी पहा https://www.contributor-covenant.org/faq